AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादांच्या आमदाराची महिला अधिकाऱ्याशी बोलताना जीभ घसरली, दिली निपटविण्याची धमकी; ऐका ऑडिओत काय म्हटलं?

दादांच्या आमदाराची महिला अधिकाऱ्याशी बोलताना जीभ घसरली, दिली निपटविण्याची धमकी; ऐका ऑडिओत काय म्हटलं?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 30, 2024 | 12:12 PM
Share

अजित पवार गटातील आमदार राजू कारेमोरे यांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अजित पवार गटातील आमदाराने ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. भंडाऱ्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या नियोजनावरून हा वाद झाला आहे. कार्यक्रम स्थळावर चिखल आणि इतर उपाययोजना नसल्याचं अजित पवार गटातील आमदार राजू कारेमोरे यांचं म्हणण होतं.

राज्यातील महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने बहिणींसोबत संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भंडाऱ्याच्या दौऱ्यावर होते. या कार्यक्रमाच्या नियोजनावरून राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटाचे भंडाऱ्याच्या तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना धमकावल्याचा एक ऑडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकवल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. या ऑडिओमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनावरून आमदार राजू कारेमोरे हे महिला अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांची जीभ घसरली, आणि महिला अधिकाऱ्यांना निपटविण्याची भाषा बोलल्याचं या ऑडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येत आहे. शनिवारला भंडाऱ्याच्या तुमसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता. जनसन्मान यात्रेनिमित्त ते लाडक्या बहिणींशी संवाद साधणार होते. मात्र, गुरुवार आणि शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं अजित पवारांचा कार्यक्रम असलेले स्थळावर चिखल निर्माण झाल्याने त्यावर तातडीनं उपाययोजना करावी, यासाठी तुमसर नगर पालिकेची जबाबदारी असताना त्यांच्याकडून ते करण्यात आलं नाही. यावरून आमदार कारेमोरे यांनी महिला अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. अजित पवार गटातील आमदार राजू कारेमोरे यांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

Published on: Sep 30, 2024 12:12 PM
Follow Us