VIDEO : भांडूपच्या गुंडाची दहशत, वाढदिवसाच्या केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला…
मुंबईतील भांडूप परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंडाचा वाढदिवस सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कुख्यात गुंडाने कापल्याचे पाहायला मिळत आहे.
भांडूपमधील एका कुख्यात गुंडाचा भलताच कारनामा समोर आला आहे. भांडूपमध्ये दहशत असणाऱ्या गुंडाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन बघून तुम्हीही डोक्याला हात मारून घ्याल. गुंडाकडून गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून आपला वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जामीनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुंड झिया अन्सारीचा हा कारनामा आहे. तर गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न भांडूपमधील या कुख्यात गुंडाकडून करण्यात आला आहे. कुख्यात गुंड झिया अन्सारीच्या बर्थ डे सिलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गुंड झिया अन्सारी हा एक नाही दोन नाही तर कित्येक केक कापताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनेक केक दिसत असून प्रत्येक केकवर भांडूप किंग झिया असं लिहिले असून त्यासोबत प्रत्येक केकवर अनेक कलमं लिहिल्याचे दिसतंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

