Bhaskar jadhav : घटनात्मक नसलेले उपमुख्यमंत्रीपद फडणवीस यांनी कसं स्वीकारलं, भास्कर जाधव यांचा सवाल
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलंय. राज्यपालांचे अनेक निर्णय हे पक्षपाती आहे.' यावेळी भास्कर जाधव यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय. अधिक वाचा...
मुंबई : घटनात्मक नसलेले उपमुख्यमंत्री पद फडणवीस यांनी कसं स्वीकारलं, असा सवाल शिवसेना (Shivsena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी केलाय. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा घरगडी असा उल्लेख केला होता. यावर भास्कर जाधव यांनी भाष्य केलंय. ‘कोश्यारी यांनी अनेकदा भाजपकडून निर्णय घेतले आहेत. राज्यातील विविध गोष्टींचा केलेला अपमान यामुळे त्यांच्या विषयी सगळ्याच जाती, धर्म, पंथाच्या लोकांच्या मनात राग आहे. राज्यपालांनी घटनेनुसार राज्य चालतंय की नाही, हे बघाव. इतकेच त्यांचे अधिकार, मात्र, राज्यपालांना सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या कामात बाधा आणण्याची भूमिका घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की, राज्यपाल भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी आहेत का, अशीही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे. राज्यपालांचे अनेक निर्णय हे पक्षपाती आहे.’ यावेळी भास्कर जाधव यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलंय.
Published on: Aug 06, 2022 05:36 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
