‘ही आमची खासगी बाब, तनिषाची मृत्यूनंतर बदनामी म्हणजे…’, भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन् केली एकच मागणी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाला एक पत्र लिहून विनंती केली आहे. बघा पत्रात नेमकं काय-काय म्हटलंय.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट केली, असं भिसे कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. तर आमच्यासंदर्भात चुकीची माहिती पोस्ट केली, असा आरोप देखील भिसे कुटुंबीयांकडून केला जात आहे. दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील भिसे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आणि त्यात डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉ. घैसास यांच्या माध्यमातून आमच्या बहिणीचे प्राण गेले, याबाबत तुम्ही जाणताच. परंतु त्यानंतर अंतर्गत समितीचा अहवाल जाहीर करून मंगेशकर कमिटी मेंबरे आमची बदनामी केली. तनिषा भिसेची मृत्यूनंतर केलेली बदनामी मानसिक छळ करणारी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला रिपोर्ट सर्वदूर पोहोचला आहे. आयव्हीएफ बाबतची माहिती ही आमची खासगी बाब आहे. तुम्ही डॉ.घैसास आणि कमिटीच्या लोकांवर कारवाई करावी, अशी विनंती भिसे कुटुंबीयांनी केली आहे.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

