भिवंडीमधील काँग्रेच्या भूमिकेवरून शहराध्यक्षांची राहुल गांधींकडे तक्रार
भिवंडी काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी राहुल गांधींकडे पक्षाच्या भूमिकेविरोधात तक्रार केली आहे. सपकाळ यांनी पक्ष भाजपला विकल्याचा गंभीर आरोप मोमीन यांनी केला असून, अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा असतानाही भाजपासोबत युती करण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे पक्षाच्या विचारधारेला धक्का लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भिवंडी काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी लेटर बॉम्ब टाकत पक्षाच्या भूमिकेवरून राहुल गांधींकडे लेखी तक्रार केली आहे. स्थानिक पातळीवर पक्षातील काही नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामध्ये, सपकाळ यांनी पक्ष भाजपला विकल्याचा गंभीर आरोप मोमीन यांनी पत्राद्वारे केला आहे.
मोमीन यांच्या तक्रारीनुसार, ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यात आले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना 47 जणांचे समर्थन मिळाले होते. तसेच, पाच अपक्ष उमेदवार कोणत्याही अटीशिवाय काँग्रेसला शहरासाठी पाठिंबा देण्यास तयार होते. हे अपक्ष उमेदवार शिंदे गट, भाजप किंवा समाजवादी पक्षाचे नव्हते. अशा परिस्थितीत, काँग्रेसला भाजपशी हातमिळवणी करण्याची काय गरज होती, असा सवाल मोमीन यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी हे विचारधारेची लढाई लढत असताना, स्थानिक पातळीवर भाजपशी युती करणे हे काँग्रेसच्या तत्त्वांशी विसंगत असल्याचे मोमीन यांचे म्हणणे आहे. समाजवादीच्या आमदाराला समाजवादी मानले जात नसेल, तर काँग्रेसचे काय होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
