Ashok Kharat Case Hearing | महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं… भोंदू खरातने हातच जोडले; काय काय घडलं कोर्टात?
अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, 14 दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक महत्त्वाचे अँगल समोर आले आहेत. भोंदू खरात प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झालेला असून, सर्व बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचेही त्यांनी कोर्टासमोर नमूद केले.
अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, 14 दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक महत्त्वाचे अँगल समोर आले आहेत. भोंदू खरात प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झालेला असून, सर्व बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचेही त्यांनी कोर्टासमोर नमूद केले. कोर्टात एका पीडितेने धैर्य दाखवत तक्रार दिली. यावर सरकारी वकिलांनी विचारले की, “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” तर खरातने कोर्टासमोर हात जोडले, “मला काही सांगायचे नाही,” असं त्याने कोर्टाला सांगितलं. भोंदू खरात प्रकरणात तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला असून, भोंदू खरातच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. या प्रकरणात आरोपीने फक्त आर्थिक व्यवहारच नाही, तर लैंगिक अत्याचार आणि अघोरी, विकृत कृत्येही केली असल्याचा आरोप आहे. एसआयटीकडून भोंदू खरातसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली. विशेष म्हणजे, सर्वात महत्त्वाचा तपास म्हणजे आरोपीने ज्या महिलांसोबत लैंगिक अत्याचार केले त्याचा तपास प्राधान्याने केला जात आहे.
Published on: Apr 02, 2026 02:34 PM
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही

