Special Report | गुजरातमध्ये भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान

भूपेंद्र पटेला यांना ना सरकारचा ना प्रशासनाचा अनुभव आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'काम दाखवा अन्यथा घरी जा' या न्यायानंच काम करत असल्यानं भूपेंद्र पटेल यांची येत्या वर्ष-सव्वा वर्षात कसोटी लागेल.

भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातमध्ये सव्वा वर्षात निवडणुका होत असून सरकारची प्रतिमा सुधारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल. मंत्रिपदाचा कसलाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागल्यानं पटेल यांचा कस लागणार आहे. आमदार भूपेंद्र पटेल थेट मुख्यमंत्री बनले. देशावर राज्य करणाऱ्या मोदी-शाहांच्या राज्याची सूत्रं एकदम नवख्या माणसाच्या हाती पडलीयत. 59 वर्षांच्या भूपेंद्र पटेल यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद हा काटेरी मुकुटच आहे. (Bhupendra Patel takes oath as Gujarat Chief Minister, big challenge for BJP to stay in power)

भूपेंद्र पटेला यांना ना सरकारचा ना प्रशासनाचा अनुभव आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘काम दाखवा अन्यथा घरी जा’ या न्यायानंच काम करत असल्यानं भूपेंद्र पटेल यांची येत्या वर्ष-सव्वा वर्षात कसोटी लागेल. मावळते मुख्यमंत्री विजय रुपानी मृदु स्वभावाचे होते. प्रशासनावर हुकूमत गाजवण्यापेक्षा प्रशासनाकडून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळं गुजरातेत मंत्री व नेत्यांपेक्षा अधिकाऱ्यांचीच चलती होती. आता ही चलती मोडून काढण्याचं पहिलं काम भूपेंद्र पटेलांना करावं लागेल. गुजरातमध्ये सव्वा वर्षात निवडणुका होतायत. गेल्या तीन निवडणुकांवर नजर टाकली तर भाजपला या निवडणुका किती आव्हानात्मक आहेत हे दिसून येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI