PM Modi B’day | मोदींच्या विढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचं आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडी दाखवून  शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडी दाखवून  शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपाध्यक्षा प्राध्यापक मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे आणि सायकलपटू उपस्थितीत होते. सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI