Kokan Railway BIG news : मध्य रेल्वेच्या मदतीने कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासून…..
ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच या कालावधीत धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्यामुळे सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे
मध्य रेल्वेच्या मदतीने गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांनिमित्त कोकणात विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्णयामुळे १५ आणि १७ सप्टेंबर रोजी मुंबईहून कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधननिमित्त सलग सुट्ट्या असल्याने मुंबई ते चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीदरम्यान स्वतंत्र विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली होती. १५ ते १९ ऑगस्टपर्यंत सलग सुट्ट्या आल्याने, मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांतील आरक्षणासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११४९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव १५ आणि १७ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९ वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता रेल्वेगाडी मडगाव येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११५० मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस १६ आणि १८ ऑगस्ट रोजी मडगाव येथून सकाळी ११ वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.