Nepal : मोठी बातमी! नेपाळमधून झेपावलेल्या विमानाचा संपर्क तुटला! विमानात 4 भारतीयांसह एकूण 22 प्रवासी
नेपाळच्या सैन्याकडूनही शोध कार्य केलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरुन एक मोठी बातमी हाती आली आहे. नेपाळमधील (Nepal) विमान (Plane Missing) 22 प्रवाशांना घेऊन झेपावलं होतं. मात्र या विमानाशी आता कोणताही संपर्क होऊ शकत नसल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जातेय. एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. 22 प्रवाशांमध्ये 4 भारतीय होते, अशीही माहिती समोर आली आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या हवाल्यानं एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. 22 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नेपाळ गृहमंत्रालयाकडून (Nepal Home Ministry) दोन खासगी हेलिकॉप्टर शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. नेपाळच्या सैन्याकडूनही शोध कार्य केलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, विमान बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

