VIDEO : जिथे रिफायनरी ठरलीय तिथेच प्रकल्प होणार, Nitesh Rane यांचा इशारा
रिफायनरी प्रकल्पावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापतांना दिसते आहे. प्रविण दरेकरांनी देखील यावर टिका केली आहे. तर नितेश राणे म्हणाले की, जिथे रिफायनरी ठरलीय तिथेच प्रकल्प होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाला किंवा विकासकामाला खिळ घालण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
रिफायनरी प्रकल्पावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापतांना दिसते आहे. प्रविण दरेकरांनी देखील यावर टिका केली आहे. तर नितेश राणे म्हणाले की, जिथे रिफायनरी ठरलीय तिथेच प्रकल्प होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाला किंवा विकासकामाला खिळ घालण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख मला भेटून गेले. माजी आमदार आहेत. तरुण नेते आहेत. ते म्हणाले हा प्रकल्प विदर्भात आला तर आम्ही त्याचं स्वागत करू. समृद्धी महामार्ग होतोय, त्या महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा आहेत. जल प्रकल्प आणि नद्या आहेत. तिथे हा प्रकल्प झाला तर त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल, असं आशिष देशमुख म्हणाले.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

