Bihar Election Results 2025 : निकालानंतर मोदींची मतदारांना मोठी ग्वाही, बिहारमध्ये पुन्हा…
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मतदारांचे अभिनंदन केले. जंगलराज पुन्हा येणार नाही अशी ग्वाही देत, त्यांनी खोट्याचा पराभव आणि जनविश्वासाचा विजय अधोरेखित केला. मतदारांनी तुष्टीकरणाऐवजी विकासाला आणि संतुष्टीकरणाला महत्त्व दिले, असेही ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जागरूक मतदार आणि सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकशाहीवरील हल्ल्यांना बिहारच्या भूमीने प्रत्युत्तर दिले असून, खोटे हरते आणि जनविश्वास जिंकतो हे सिद्ध झाल्याचे सांगितले.
मोदींच्या मते, बिहारच्या मतदारांनी, विशेषतः तरुणांनी, मतदार यादीच्या शुद्धीकरणाला महत्त्व दिले आहे. त्यांनी जंगलराज पुन्हा बिहारमध्ये परत येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली. काँग्रेस आणि लाल झेंडेवाल्यांच्या दहशतीने उद्ध्वस्त झालेल्या तरुणाईच्या आणि राजदच्या राजवटीतील जंगलराज सोसलेल्या माता-भगिनींच्या विजयाचे श्रेय पंतप्रधानांनी दिले. भारताला आता केवळ जलद विकास हवा असून, तुष्टीकरणाला नाही तर संतुष्टीकरणाला महत्त्व दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

