Bihar Election Results 2025 : आमचं डोकं खराब आम्हाला मोदीच पाहिजे.. महिला मतदारांचा मोदींवर विश्वास… NDA बहुमतावर राणा काय म्हणाल्या?
नवनीत राणा यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2025 मधील NDA च्या दणदणीत विजयावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारामुळे भाजप आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांचा पंतप्रधान मोदींवरील विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि विकासाची अपेक्षा ही NDA च्या यशाची प्रमुख कारणे ठरल्याचे राणा यांनी सांगितले.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये NDA ला मिळालेल्या प्रचंड बहुमतावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कलांनुसार, एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून, तेजस्वी यादव-राहुल गांधींच्या महाआघाडीचा धुव्वा उडाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये प्रचार केलेल्या मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली आहे. 61 पैकी 49 मतदारसंघांत NDA चे उमेदवार पुढे आहेत, असे राणा यांनी नमूद केले.
राणा यांनी सांगितले की, मतदारांचा, विशेषतः महिलांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दृढ विश्वास होता. महिलांनी “आम्हाला मोदीच पाहिजे” अशा भावना व्यक्त केल्या, ज्यातून त्यांच्या मनात मोदींवरील प्रेम आणि भविष्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज दिसून येते. मोदी सरकारने बिहारमध्ये केलेल्या बदलांमुळे आणि केंद्र तसेच राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्यास विकासाला गती मिळेल यावर जनतेचा विश्वास होता, असे राणा म्हणाल्या. ईव्हीएमवर होणारे आक्षेप बिहारच्या निकालांनी शांत केले आहेत.
मध्यप्रदेशातील लाडकी बहीण योजना आणि बिहारमध्ये महिलांना थेट 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा निवडणुकीत फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांना सुरक्षिततेची भावना आणि मुलांना रोजगाराची आशा यामुळे जनतेने मोदींच्या कामाला पसंती दिल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

