Bihar Election Results 2025 : ढोल-ताशे अन् मिठाई… निकालापूर्वीच कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष, NDAच्या दणदणीत विजयामुळे बिहारमध्ये एकच कल्ला
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या ताज्या कलांनुसार, एनडीए दणदणीत बहुमताकडे वाटचाल करत आहे, तर महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपने 84, जेडीयूने 76 जागांवर आघाडी घेतली आहे. आरजेडीच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली असून, तेजस्वी यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेते पिछाडीवर आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीच्या ताज्या कलांनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून, राज्यात जोरदार जल्लोष सुरू झाला आहे. एनडीए सध्या 186 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) 84 जागांवर, तर जनता दल युनायटेड (जेडीयू) 76 जागांवर आघाडीवर आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाआघाडी 49 जागांवर पिछाडीवर आहे. मागील निवडणुकीत 75 जागा जिंकणाऱ्या आरजेडीला यंदा केवळ 34 जागांवर समाधान मानावे लागत आहे. तेजस्वी यादव आणि खेसारीलाल यादव यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवार आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या उमेदवारांनाही यश मिळालेले नाही.
Published on: Nov 14, 2025 01:26 PM
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
