AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVPAT Slip Controversy: VVPAT पावत्या रस्त्यावर दिसल्यानं खळबळ, आयोगाचा कारभार पुन्हा वादात! बिहारमध्ये घडलं काय?

VVPAT Slip Controversy: VVPAT पावत्या रस्त्यावर दिसल्यानं खळबळ, आयोगाचा कारभार पुन्हा वादात! बिहारमध्ये घडलं काय?

| Updated on: Nov 08, 2025 | 10:01 PM
Share

बिहारच्या समस्तीपूरमध्ये मतदानावेळच्या व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर सापडल्याने राजकारण तापले आहे. आरजेडीने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. निवडणूक आयोगाने ही डमी मतदानाची प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण देत, एका अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात मतदानावेळच्या व्हीव्हीपॅट (VVPAT) पावत्या एका कॉलेजच्या आवारात उघड्यावर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकारण चांगलेच तापले असून, राष्ट्रीय जनता दलाने (RJD) निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आरजेडीने चोर आयोग यावर उत्तर देणार का, असा सवाल विचारला आहे. यावर निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या डमी मतदानाच्या पावत्या होत्या, ज्या निष्काळजीपणे निवडणूक अधिकाऱ्याने टाकल्या होत्या. याप्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Nov 08, 2025 10:01 PM