मल्लिकार्जुन खर्गे राजीनामा देणार? राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबद्दल राहुल गांधी यांना प्रश्न विचारणार का? असा सवाल भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना केल्यानंतर आता भाजपच्या बड्या नेत्याने राहुल गांधींनी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खर्गेंचा राजीनामा मागितला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे राजीनामा देणार? राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
| Updated on: Sep 12, 2024 | 11:33 PM

राहुल गांधींनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या कथित आरक्षणविरोधी वक्तव्यावरून भाजप आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. ते अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर येथे बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे आज (१२ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघाचा पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. “जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही”, असं वक्तव्य काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी एका कार्यक्रमात केले. यावरून महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनीही भाष्य केले आहे. ‘मराठा आरक्षणासाठी महायुती आणि भाजपने संघर्ष केला. मराठ्यांना देण्यात आलेलं आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार का? मनोज जरांगे पाटील म्हणतील का की, राहुल गांधी देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे.’, असा सवाल करत त्यांनी जरांगेंवर निशाणा साधला.

Follow us
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....