आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची मोठी घोषणा, संपूर्ण महाराष्ट्रात…
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात भाजपची संवाद यात्रा निघणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसूख घेतलं. बघा काय केला हल्लाबोल?
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहे. संपूर्ण राज्यभरात भाजपची संवाद यात्रा निघणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसूख घेतलं. पंतप्रधान पदाबाबत बोलताना विरोधकांनी तारतम्य पाळलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या नेत्याबाबत आम्ही असं वागत नाही. पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं म्हणून नरेंद्र मोदी हे लहान होणार नाही. इंडिया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक आहेत असंही बावनकुळेंनी म्हणत विरोधकांना फटकारलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणालाच चिंतेची गरज नाही. ज्यांनी खेळ मांडलेला त्यांना खेळ लखलाभ असो.. असं वक्तव्य करत बावनकुळे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

