AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘2024 पर्यंत पुढचा राजकीय बॉम्ब ब्लास्ट होईल’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य; आता कोणत्या पक्षाला खिंडार पडणार?

‘2024 पर्यंत पुढचा राजकीय बॉम्ब ब्लास्ट होईल’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य; आता कोणत्या पक्षाला खिंडार पडणार?

| Updated on: Aug 27, 2023 | 7:24 AM
Share

राज्यभर सध्या राजकीय पक्षांचे दौरे आणि सभा होत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभंच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्ष हे जनतेपर्यंत जात आहेत.

मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज्यात जोरदार शक्तिप्रदर्शन होताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते हे आता थेट जनतेपर्यंत जाऊ लागले आहेत. तर अनेक नवीन चेहऱ्यांसह जुने नेते देखील या पक्षातून त्या आणि त्या पक्षातून या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. याचदरम्यान भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा करत सुचक वक्तव्य केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्यभरामध्ये संपर्क ते समर्थन अभियान राबवले जात आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं. त्यांनी 2024 पर्यंत पक्षप्रवेशाचे राज्यात बॉम्ब ब्लास्ट होतील असे म्हटलं आहे. तर यामुळे मविआतच मोठी अस्वस्थता निर्माण होईल असेही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे सध्या राज्यात कोणत्या पक्षाला खिंडार पडणार अशी चर्चा रंगली आहे.

Published on: Aug 27, 2023 07:24 AM