Chitra Wagh : हरामखोर, विकृत येत्या काही तासात … पुण्याच्या तरूणीवर लैंगिक अत्याचार, चित्रा वाघ यांचा संतापल्या
पीडित तरूणी घरी एकटीच असल्याचे हेरून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तिला बेशुद्ध केलं. यानंतर घरात घुसून तरूणीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरला असून चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त केलाय.
पुण्यातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगून प्रवेश केला आणि तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पुणे हादरलं आहे. यावर भाजपच्या नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही घटना धक्कादायक आहे. हरामखोराची विकृती बघा पेन मागण्याचा बहाणा केला घरात शिरून स्प्रे मारला, अत्याचार केला आणि नंतर सेल्फी काढला. इतकंच नाहीतर तर कोणाला हा प्रकार सांगितला तर तुझा फोटो व्हायरल करेन अशी धमकी त्या पीडितेला देण्यात आली’, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.
या प्रकरणी बोलताना चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद झाली असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास सुरू झालाय. येणाऱ्या काही तासात जास्तीत जास्त एक दोन दिवसात हा हरामखोर आरोपी पकडला जाईल, असा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.