५० टक्के, महिला ओक्के ! लालपरीतून चित्रा वाघ यांचा सवलतीत प्रवास अन् फडणवीस यांचे मानले आभार
VIDEO | भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा नाशिक ते मालेगाव असा एसटी बसने प्रवास, ५० टक्के सवलतीचा लाभ घेत काय म्हणाल्या...
नाशिक : राज्यातील महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. याच योजनेचा लाभ घेत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ नाशिकच्या ठक्कर बस स्थानक ते मालेगाव असा सवलतीच्या दरात प्रवेश केला. तसेच या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. चित्रा वाघ यांनी बसमधून प्रवास करतानाचे फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी प्रवासादरम्यान, चित्रा वाघ यांच्यासोबत भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यादेखील होत्या. त्यांनी सवलतीच्या दरात प्रवेश करताना पन्नास टक्के महिला ओक्के अशा जोरदार घोषणाही दिल्यात.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

