Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो मोठी बातमी… 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देण्यात आलं होतं. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
गेल्यावर्षी जुलैपासून माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. मात्र निवडणुकीच्या काळात महायुतीने आम्ही विजयी झाल्यास १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये मिळणार असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे २१०० रूपये कधी मिळणार? याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागून आहे. जानेवारी महिन्याचा हफ्ता येत्या २६ जानेवारीच्या पूर्वी लाडक्या बहिणींना मिळतील, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील, असं देखील मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. मात्र तो हफ्ता १५०० रूपयांचा असणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या योजनेसंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी अपडेट दिली आहे. लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये २१०० रुपयांप्रमाणे पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तर सरकार नक्की देणार आणि महिलांनी जो महायुतीवर विश्वास दाखवला तो कधीही तोडू देणार नाही, आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू, या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळून दिलं आहे. त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला २१०० रुपयांप्रमाणे पैसे येतील, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव

EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
