भाजप नगरसेवकाची काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
नागपुरात भाजप नगरसेवकाने (BJP Corporator) काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा (Vickey Kukareja) यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचे व्हिडीओ फूटेज समोर आले आहे.
नागपुरात भाजप नगरसेवकाने (BJP Corporator) काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा (Vickey Kukareja) यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचे व्हिडीओ फूटेज समोर आले आहे. काँग्रेस कार्यकर्ता बाबू खान यांना मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. उत्तर नागपूर (Nagpur) काँग्रेस कमिटीचे अनिल नगरारे आणि सुरेश पाटील यांनी यासंदर्भात पुरावे सादर केले आहेत. काँग्रेसकडून पोलिसांना पुरावे सादर केले जाणार आहेत. मात्र पोलिस आरोपीला वाचवत असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याच्या प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विक्की कुकरेजा यांच्याकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पोलीसांत तक्रार नोंदवली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

