Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु : देवेंद्र फडणवीस
अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. माहराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही सुरू आहे. आणि रोखशाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला थांबवणे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने राज्यात लोकशाहीच कुलूपबंद केली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे, अशा घणाघात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याच्या अधिवेशनात भाजपच्या आमदारांचं संख्याबळ कमी व्हावं, यासाठीच त्यांना वर्षभर सस्पेंड केल्याचा आरोप फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी केलाय. भाजपच्या 12 आमदारांना वर्षभर निलंबन कायम ठेवण्याच्या निर्णयाविरोधात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढी कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. माहराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही सुरू आहे. आणि रोखशाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला थांबवणे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
