Vidhan Parishad Election | विझलो आज जरी मी… भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट, यादी जाहीर होताच कवितेतून भाव केले व्यक्त
विधान परिषदेवर कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळणार, याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान काहीसा कालावधी शिल्लक असताना, भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात एका विद्यमान आमदाराचा पत्ता कापल्याने, तो नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे
विधान परिषदेवर कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळणार, याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान काहीसा कालावधी शिल्लक असताना, भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात एका विद्यमान आमदाराचा पत्ता कापल्याने, तो नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू असल्याचं म्हटलं जातं. संजय केनेकर हे मागील 35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.
भाजपकडून उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर संजय केनेकर यांना जागा मिळाली नसल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर कविता ठेवून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी आमदार संजय केनेकर यांची ओळख आहे.
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही….. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही… आपल्या फोटोसह या कवितेच्या ओळी केनेकर यांनी स्टेट्सला ठेवल्या आहेत.
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा

