Gopichand Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आलं आहे. अशातच विधीमंडळात काही गोष्टी घडताना पाहायला मिळत आहे. तर सभागृहात आज पडळकर यांचं तालिका अध्यक्षांबरोबर वाकयुद्ध झालं तर दादा भुसेंसोबतही जुंपली.
विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं तर दुसरीकडे मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यातही जुंपली. विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या मुद्द्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे. लक्षवेधीच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर हे मुद्दा मांडत असतानाच तालिका अध्यक्षांसोबत हे वाकयुद्ध रंगलं.
सभागृहात बोलत असताना पडळकरांनी बिंदु नामावलीचा मुद्दा उपस्थित केला. पडळकर म्हणाले, बिंदु नामवली १९७० ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा ओबीसीच आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा बिंदु नामवलीत बदल झाला. नंतर व्हीजेएनटी त्यात प्रवर्ग तयार केला. ९७ ला परत ती बिंदु नामवली बदलल्या. २०१८ ला मराठा आरक्षण आलं परत बिंदु नामवली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत त्यात बदल झाला.’ यानंतर सभागृहाचा वेळ मर्यादित असल्याने तालिका अध्यक्षांनी पडळकरांना थांबवले असता त्यांच्यात वाकयुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

