Gopichand Padalkar : पडळकरांना अश्रू अनावर… धनगर, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अन् विरोधकांना टोला, चौंडीतून फटकेबाजी
ओबीसींचे गेलेले आरक्षण शिंदे आणि फडणवीस यांनी टिकवले. लव्ह जिहादविरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मोठी मागणी पडकळांनी चौंडीतून जाहीरपणे केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव राज्यभरात ठीक ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा होत आहे. अशातच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहिल्यानगरच्या चौंडी येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आपले भाषण सादर केले.
अहिल्यादेवींची एवढी मोठी जयंती कधी झाली नव्हती. अहिल्यादेवी होळकरांवर बोलताना पडळकरांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी पडळकरांनी ओबीसी धनगर आरक्षणावर भाष्य केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवले असे सांगत असताना धर्मांतर आणि लव्ह जिहाद कायद्यावरही मोठी त्यांनी मागणी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले, अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण कृतीशून्य असलेले राजकारणी वेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

