भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत ‘इतक्या’ जागा लढवणार, सूत्रांची माहिती काय?
भाजप 2019 साली जेवढ्या जागा लढला तेवढ्याच जागा आताही लढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे भाजप 164 च्या आसपास जागा लढण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रात येत्या 10 ते 12 नोव्हेंबरदरम्यान, विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असताना भाजपने गेल्या वेळी जेवढ्या जागा लढवल्या तेवढ्याच जागा यंदाच्या निवडणुकीत लढवण्याची शक्यता आहे. भाजप विधानसभा निवडणुकीला 164 च्या आसपास जागा लढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचं काम साधारण 80 टक्के पूर्ण झालं असल्याचीही माहिती मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा निकष लक्षात घेता भाजप आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचीही माहिती मिळतेय. मात्र अद्याप महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय झालेला नाही. ’70 ते 80 टक्के जागांवर लढण्याचा निर्णय महायुतीमध्ये झाला आहे. आमच्यात निर्णय लवकर होती. महायुतीत कोणती जागा कोणाला द्यायची यासंदर्भात कोणताही वाद नाही. आता आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत. यासोबत आमच्या एक एक जागेचा निर्णय हा मेरिटवर करण्यात येणार आहे.’, असे चंद्रशेखऱ बानवकुळे यांनी म्हटले आहे.