VIDEO : Subhash Desai On BJP Power | भाजपकडून एकनाथ शिंदेचा वापर केल्याचे सुभाष देसाई सांगतात
शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनीही युक्तिवाद केला. आता पुढील कोर्टाची सुनावणी ही सोमवारी 8 आॅगस्टला ठेवण्यात आलीयं. मात्र, यादरम्यान सुभाष देसाईंनी यासंदर्भात अत्यंत मोठे विधान केले आहे. सुभाष देसाई म्हणाले की, भाजपकडून एकनाथ शिंदेचा वापर केला जातोयं.
राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झालीयं. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्ट सुरू होताच युक्तिवादाला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनीही युक्तिवाद केला. आता पुढील कोर्टाची सुनावणी ही सोमवारी 8 आॅगस्टला ठेवण्यात आलीयं. मात्र, यादरम्यान सुभाष देसाईंनी यासंदर्भात अत्यंत मोठे विधान केले आहे. सुभाष देसाई म्हणाले की, भाजपकडून एकनाथ शिंदेचा वापर केला जातोयं. भाजपाच्या अत्यंत वरिष्ठ नेत्यांनी हे सर्व घडवून आणले आहे. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे देण्याची गरज नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. त्यावर हे प्रकरण लार्जर बेंचकडे द्यायचं की नाही हे आम्ही ठरवू, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

