Maratha Reservation | ‘सरसकट कुणबी आरक्षण दिलं तर तात्पुर्ती मलमपट्टी होईल’, ‘या’ मंत्र्यानं स्पष्टच म्हटलं
VIDEO | 'जर मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण दिलं ते कोर्टात टिकणारं नाही. तर तात्पुर्ती मलमपट्टी होईल', मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली थेट प्रतिक्रिया
नाशिक, ११ सप्टेंबर २०२३ | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा १४ वा दिवस आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी जातीचं प्रमाणपत्र द्यावे, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, जर तात्काळ कोणतंही आरक्षण दिलं आणि त्यावर शासनाने जीआर काढला तर ते आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना समजवण्याचाही प्रयत्न केला जातोय. पण ते त्यांच्या मागणीवरच ठाम आहेत. मात्र जर मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणारं नाही. तर तात्पुर्ती मलमपट्टी होईल, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

