Pankaja Munde Video : ‘…तर आंनद झाला असता’, बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंनी काय व्यक्त केल्या भावना?
अखेर दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पदं जाहीर झाली आहेत. त्यावेळी सगळ्यांच लक्ष बीड जिल्ह्यावर होतं. बीडचा पालकमंत्री कोण होणार? याकडे लक्ष लागलेलं असताना अजित पवार यांच्याकडे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी लावून धरली होती. अशातच बीडचा पालकमंत्री कोण होणार? यासह बीडच्या पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध अशातच अखेर दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झाला. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा पत्ता या पदावरून कट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात बीडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली. अशातच महायुतीतील नेत्यांमध्ये पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी असल्याची चर्चा होतेय. तर स्वतः पकंजा मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे.
‘बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता’, असं म्हणत बीडच्या पालकमंत्रीपदावरील प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला पालकमंत्रीपद मिळालं असतं तर बीडकरांना देखील आनंद झाला असता, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘मी बीडची लेक आहे. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा पाच वर्षांचा काळ हा बीडच्या इतिहासातील सर्वाधिक विकसनशील राहिलेला आहे. कोणत्याही विचारांचा व्यक्ती हे मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेत. त्याबद्दल कोणतीही असहमती न दर्शवता आपल्याला जे मिळाले आहे. त्यात जास्तीत जास्त काम करण्याच्या भूमिकेत असणार आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव

EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
