Chandrakant Patil on CM | मुख्यमंत्र्यांकडून प्रताप सरनाईक यांची पाठराखण : चंद्रकांत पाटील

लोकांची कामं केली म्हणजे गुन्हा करता येत नाही. जजमेंट देताना असं कधी होतं का, त्याच्या वकिलाने त्याची लोकोपयोगी कामं मांडावीत. त्याच्या तीन मर्डरमधले दोन मर्डर माफ, असं काही असतं का, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

मुंबई : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारे लगावले. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. लोकांची कामं केली म्हणजे गुन्हा करता येत नाही. जजमेंट देताना असं कधी होतं का, त्याच्या वकिलाने त्याची लोकोपयोगी कामं मांडावीत. त्याच्या तीन मर्डरमधले दोन मर्डर माफ, असं काही असतं का, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI