'पनवती'वर पलटवार, चित्रा वाघ थेटच म्हणाल्या, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी म्हणजे...

‘पनवती’वर पलटवार, चित्रा वाघ थेटच म्हणाल्या, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी म्हणजे…

| Updated on: Dec 03, 2023 | 10:18 PM

चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लगला असून या निवडणुकीत जनतेने भाजपला पसंती दिल्याचे दिसून आहे. आहे. तर देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पाहिला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी काय केला विरोधकांना हल्लाबल?

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ : देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लगला असून या निवडणुकीत जनतेने भाजपला पसंती दिल्याचे दिसून आहे. आहे. तर देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पाहिला मिळत आहे. इतके डावपेच केल्यानंतरही मोदी यांनी विरोधकांना चीतपट केले आहे. निवडणुकीच्या काळात विरोधकांनी आकाश पाताळ एक केलं होतं. पण मोदी यांची गॅरेंटी आणि देशाचा विश्वास यामुळे चारही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपचा दणदणीत विजय झाल्याचे समोर आले आहे, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या सुनावले आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या की, तिनही राज्यातील महिला भगिनींनी मातृशक्तीने मोठ्या भक्कम पद्धतीने मोदी यांना साथ दिली आहे. तर फक्त फोटो काढण्यापूर्त गरिबांमध्ये मिसळणं वेगळं आणि गरिबांसाठी अहोरात्र काम करणं वेगळं असं म्हणत चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला आहे.

Published on: Dec 03, 2023 10:18 PM