'नेमकी पनवती कोण?' देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांची बोलतीच केली बंद, म्हणाले...

‘नेमकी पनवती कोण?’ देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांची बोलतीच केली बंद, म्हणाले…

| Updated on: Dec 03, 2023 | 5:25 PM

चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालंय. हे यश जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास, या विश्वासाचं हे यश आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे.

नागपूर, 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लगला असून या निवडणुकीत भाजपच कमळ फुलताना दिसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन जिल्ह्यांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालंय. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालंय. हे यश जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास, या विश्वासाचं हे यश आहे, असे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसने गेल्या काही दिवसात पनवती हा ट्रेंड सुरू केला होता आणि भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेसच्या लक्षात आलंच असेल नेमकी पनवती कोण आहे. त्यामुळे पुन्हा मोदींबद्दल ते असे शब्द वापरणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी राहुल गांधींची बोलती बंद केली आहे.

Published on: Dec 03, 2023 05:25 PM