Chitra Wagh : ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज अन् नुसत्या … चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटावर मुंबई पालिकेच्या एफडीवरून हल्लाबोल केला आहे. शहर चालवण्यासाठी विकास महत्त्वाचा असून केवळ बँकेचे खाते वाढवणे पुरेसे नाही, असे त्यांनी म्हटले. ७० हजार कोटी एफडीत पडून असताना मुंबईकर फुटके रस्ते आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत होते. महायुती सरकारने तोच निधी विकासकामांसाठी वापरल्याचे वाघ यांनी नमूद केले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटावर मुंबई पालिकेच्या (BMC) एफडी व्यवस्थापनावरून जोरदार टीका केली आहे. “शहर चालवायचंय, बँक खातं नाही हे ठाकरे विसरलेत,” असे वाघ यांनी म्हटले. मुंबई पालिकेच्या एफडीवर फुशारक्या मारणाऱ्या ठाकरे गटाला त्यांनी लक्ष्य केले. २०१४ पासून एफडीची रक्कम कशी वाढली, याचे स्पष्टीकरण देण्याचे आव्हान चित्रा वाघ यांनी दिले. प्रश्न एफडीचा नसून विकासाचा आहे, असे त्या म्हणाल्या. ७० हजार कोटी रुपये एफडीमध्ये पडून असताना मुंबईकर मात्र फुटके रस्ते, जुना ड्रेनेज आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत होते. एफडी वाढली यात कर्तृत्व काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) यांच्या नेतृत्वाखाली निर्णयक्षम महायुती सरकार सत्तेत आल्यावर हाच पैसा कोस्टल रोड आणि मेट्रोसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी वापरला गेला, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत
जलील यांच्या MIM पक्षाच्या रॅलीत कार्यकर्त्यांनाच मारहाण, घडलं काय?
जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, थेट 50 जणांवर...

