Chitra wagh : मोठ्ठ्या ताई… महाराष्ट्राची माफी मागा अन्…, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा
VIDEO | पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची माफी मागा आणि महाराष्ट्रदोहीपणा थांबवा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. तर सुप्रिया सुळे महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केलाय.
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात तूतू-मैंमैं होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची माफी मागा आणि महाराष्ट्रदोहीपणा थांबवा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केलाय. ‘कितीही हा महाराष्ट्रद्रोहीपणा आणि करंटेपणा. आपल्याच राज्याची प्रगती तुम्हाला सहन होत नाही का हो..?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. कधी आयएसआय फंडेड वेबसाईटची माहिती सांगत महाराष्ट्रात विद्वेष पसरल्याचे सांगता, तर कधी महाराष्ट्रात उद्योग येऊनही उद्योग बाहेर चालल्याचा कांगावा पिटता. महाराष्ट्राची तत्काळ माफी मागा आणि हा महाराष्ट्रद्रोहीपणा थांबवा..! असे चित्रा वाघ यांनी म्हटलं असून आक्रमक मागणी केलीय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

