AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis UNCUT | सरकार येईल तर आपलं बोनस समजा, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 10:08 PM
Share

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर ‘काय दे’चे राज्य सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलाय.

मुंबई : अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर ‘काय दे’चे राज्य सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलाय. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहे. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. या सरकारमध्ये कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणीही पाहायला तयार नाही. एका मुलीवर 400 लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करु. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केलीय.