Pramod Jathar | शिवसेनेने जर जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार : प्रमोद जठार

टीव्ही 9 ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, टीव्ही 9 ने ती क्लीप बाहेर आणल्यामुळे टीव्ही 9 चे अभिनंदन. त्या दिवशी पोलिस दरवाजा तोडणार अशी धमकी देत होते. मोघलाई आहे. म्हणून मी याची तुलना त्यावेळच्या औरंगजेबाच्या सत्तेशी केली.

सिंधुदुर्ग : शिवसेनेने जर जन यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार असा सणसणीत इशारा कोकण जन आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला आहे. टीव्ही 9 ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, टीव्ही 9 ने ती क्लीप बाहेर आणल्यामुळे टीव्ही 9 चे अभिनंदन. त्या दिवशी पोलिस दरवाजा तोडणार अशी धमकी देत होते. मोघलाई आहे. म्हणून मी याची तुलना त्यावेळच्या औरंगजेबाच्या सत्तेशी केली. संभाजी महाराजांशी तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. राजन साळवी यांना इतिहासाचे ज्ञान नाही. पॅसिफिक महासागरामधील एका बेटावरून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी आणली आहे. कोणीतरी भडकवलं त्यांना, हे करा नाहीतर पुढच्या वेळी तिकीट नाही. आणि त्यांची लस इकडे लागली म्हणून वैभव नाईकांना सांगितलं तुम्ही नाही बोललं तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. दोघेही दुःखी आत्मे आहेत, अशी प्रतिक्रिया जठार यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI