‘पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाच्या आकाचे आदेश?’, जरांगे पाटलांवर भाजप नेत्याचं टीकास्त्र
मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाच्या नौटंकीचं हत्यार उगारलं आहे. तर मनोज जरंगे पाटलांनी सांगावं तुमच्या आकाच्या आकाचे हे आदेश आहेत का? असा सवाल करत प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर हल्लाबोल लढवलाय.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उगारलं आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केल्यानंतर भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाच्या नौटंकीचं हत्यार उगारलं आहे. तर मनोज जरंगे पाटलांनी सांगावं तुमच्या आकाच्या आकाचे हे आदेश आहेत का? असा सवाल करत प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर हल्लाबोल लढवलाय. तर समाजाची फसवणूक करून पुन्हा उपोषणाची नौटंकी का? असा सवालही प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. ‘ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाच्या नौटंकीचं हत्यार उगारलं. मला मनोज जरांगेंना विचारायचं आहे, हे तुमच्या आकाच्या आकाचे आदेश आहेत का? समाजाला गंडवून, समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी?’, असा सवाल प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलाय. दरम्यान, प्रसाद लाड पुढे असेही म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय केलं? हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू. म्हणजे ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश काय आहेत? या राज्याला अस्थिर कारण्याचे आहेत का? हे लोकांसमोर येईल, असं आव्हानच लाड यांनी दिलं.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

