Special Report | इंधन दर भडकण्यात नेमका अमेरिकेचा संबंध कसा?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

औरंगाबादः आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने काढलेल्या महागाईच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं. केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असे असतानाही आपण केंद्र सरकारने आपला कर कमी केला. पण राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही. हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीकाही दानवे यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI