Sudhir Mungantiwar | अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईकडे पाहताना राजकीय चष्मा नको : सुधीर मुनगंटीवार

सत्ताधाऱ्यांच्या खंडणी प्रकरणापुढे खंडणीखोरांनी देखील आत्महत्या करावी अशी स्थिती असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. इतिहासात पहिल्यांदाच माजी गृहमंत्री आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त दोघेही फरार असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

चंद्रपूर : माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आयकर धाडीकडे पाहताना राजकीय चष्मा नको अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यात पोलिसांचे राजकियीकरण झाल्याने सर्व समस्या उद्भवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांच्या खंडणी प्रकरणापुढे खंडणीखोरांनी देखील आत्महत्या करावी अशी स्थिती असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. इतिहासात पहिल्यांदाच माजी गृहमंत्री आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त दोघेही फरार असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI