Beed Crime Cases Video : परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट, ‘चेतना कळसेपासून ते संतोष देशमुखांपर्यंत…’
परळीतील हत्यांच्या मालिकेवर बोट ठेवत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. महादेव मुंडे यांच्या हत्येची आरोपी आकाच्या पुत्राच्या जवळचे होते, असा गौप्यस्फोट करत त्यांनी परळीतील अनेक हत्यांवर त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
आजवर झालेल्या खुणांचे पट जर उलगडले गेलेत. तर एखाद्या क्राईम वेबसिरीजही फिकी पडेल, इतकी किड्या-मुंग्यांसारखी परळीत गेल्या दशकांपासून खून झालेत. अनेक घटना तर गुढ बनूनच राहिल्या आहेत. साल १९९७-९८ चं ठिकाण परळी एका कला शिक्षकाची तरूण मुलगी जळून मरते. तिच्या हत्येनंतर तिचे वडील स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करतात. पुढे साऱ्या कुटुंबाची वाताहत होते. पण तरूणीसोबत नेमकं काय घडलं होतं हे काहीच बाहेर आलं नाही. २००१ साली परळीतच संगीत दिघोळे नावाच्या राजकीय कार्यकर्त्याचा भर दिवसा परळी कोर्टासमोर खून होतो. जवळपास १०० लोकं उघड्या डोळ्यांनी हत्या पाहतात पण दहशतीमुळे साक्ष कोणाचीच नाही. २००८ साली परळीत संगीत दिघोळेची हत्या करणाऱ्या आरोपी किशोरी फड यांची हत्या होते. आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटतात. २०१५ साली आधीच्या हत्येतील आरोपी काकासाहेब गर्जेची हत्या होते. त्या प्रकरणाचाही सोक्ष मोक्ष नाही. तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या साऱ्या हत्येची काहणी सांगणार एक व्हिडीओ कमलाकर राऊत नावाच्या व्यक्तीने केला होता. ज्या वरून त्यांना अनेक धमक्या आल्या होत्या. याच घटनावर सुरेश धस यांनी बोट ठेवत साऱ्या खुनांच्या मालिकेवर बोट ठेवलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

