Special Report | नारायण राणे, चंद्रकांत पाटलांच्या टार्गेटवर ‘संजय राऊत’!
सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान बॅटिंग करत दादरा नगर हवेली, इंधन दरकपात, बारामतीमधला पवार-ठाकरेंचा कार्यक्रम, ईडी सीबीआयच्या धाडी आदी विषयांवर त्यांनी फटकेबाजी केली. तर राऊतांवर टीका करताना मात्र त्यांनी हात आखडता घेतला नाही.
मुंबई : रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतं. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात. मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही, असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पवार ठाकरेंवर जोरदार आसूड ओढले. सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान बॅटिंग करत दादरा नगर हवेली, इंधन दरकपात, बारामतीमधला पवार-ठाकरेंचा कार्यक्रम, ईडी सीबीआयच्या धाडी आदी विषयांवर त्यांनी फटकेबाजी केली. तर राऊतांवर टीका करताना मात्र त्यांनी हात आखडता घेतला नाही.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
