Mahadev Bhandari : …त्याशिवाय 26/11 हल्ला शक्यच नाही, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, थेट ‘या’ राजकीय पक्षांवर गंभीर आरोप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी माधव भंडारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आरोप केला.
‘मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता’, असं वक्तव्य करत भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी खळबळजनक दावा केला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार ही सगळ्यांनाच कल्पना होती, असंही माधव भंडारी यांनी म्हणत एकच खळबळ उडवून दिली. पुढे ते असेही म्हणाले की, स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही. पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माधव भंडारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात माधव भंडारी यांनी हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, माधव भंडारी यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया देत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. ‘एखाद्या रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे’, असं वडेट्टीवार म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

