AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray vs Rane : 'चाटम'च्या टीकेला 'वाकरे'नं उत्तर, उद्धव ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जुंपली, बघा वार-पलटवार

Thackeray vs Rane : ‘चाटम’च्या टीकेला ‘वाकरे’नं उत्तर, उद्धव ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जुंपली, बघा वार-पलटवार

| Updated on: Jan 06, 2026 | 2:08 PM
Share

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना उद्धव वाकरे संबोधले आहे. अमित साटम यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना राणे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जिहाद्यांपुढे वाकल्याने ठाकरेंचा कणा मोडल्याचे ते म्हणाले. मुंबई आणि कोकणातील जनता मतपेटीतून या अपमानाचा बदला घेईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर, नितेश राणे यांनी ठाकरेंना उद्धव वाकरे असे संबोधले आहे. या संदर्भात बोलताना नितेश राणे यांनी म्हटले आहे की, अमित साटम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले की, “मी त्याला वाकरे म्हणेन, कारण का जिहाद्यांच्या समोर वाकून वाकून त्याचा कणाच मोडलेला आहे.” राणे यांनी ठाकरेंना मुद्द्यांवर बोलण्याचा सल्ला दिला, तसेच त्यांनी मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या भेटीचा उल्लेख करत, त्याचा मुंबईशी संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. मुंबई आणि कोकणातील जनता या अपमानाचा वचपा निश्चितपणे मतपेटीतून घेईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. ही टीका आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापवणारी ठरली आहे.

Published on: Jan 06, 2026 02:08 PM