Pankaja Munde PA Wife Death : घटना घडली तेव्हा मी 29व्या मजल्यावरून… पत्नीच्या आत्महत्येवेळी नेमकं काय घडलं? PA अनंत गर्जेचा खुलासा
अनंत गर्जे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, घटनेच्या वेळी ते घरी नव्हते. परत आल्यावर त्यांना घराचे दरवाजे आतून बंद दिसले. त्यानंतर त्यांनी ३१ व्या मजल्यावरील खिडकीतून उतरून २९ व्या मजल्यावरील रिफ्युजी एरियाचा वापर केला आणि तिथून ३० व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यूने एक गूढ निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या गौरीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त होते. या घटनेसंदर्भात बोलताना अनंत गर्जे यांनी पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी ते घरी नव्हते. परत आल्यावर घराचे दरवाजे आतून बंद असल्याने, त्यांनी २९ व्या मजल्यावरील रिफ्युजी एरियातून ३० व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये खिडकीतून प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर त्यांना गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून जवळच्या पोद्दार रुग्णालयात नेले, जिथून नंतर तिचा मृतदेह नायर रुग्णालयात पाठवण्यात आला. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, गौरीला अनंत गर्जे यांच्याकडून मारहाण होत होती आणि दोघांमध्ये वाद होत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस सत्य उघड करण्यासाठी अधिक तपास करत आहेत.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

