Pankaja Munde Video : ‘चार-पाच महिने गप्प बसले, पण आता…’, पंकजा मुंडे धसांवरील प्रश्नावर बोलताना भडकल्या
प्रचार करताना धसांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं धसांनी आत्मपरिक्षण करावं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
सुरेश धस हे सातत्याने माझा उल्लेख करतात. त्यांनी माझ्याविषयी कुठलीही वैयक्तिक टिप्पणी करणे अपेक्षित नसताना त्यांनी ते केले. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांना समज देण्याविषयी विनंती केली होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी ‘सुरेश धसांना समज द्या’, अशा मथळ्याने बातम्या छापल्या असल्याचे पकंजा मुंडे म्हणाल्यात. यासंदर्भात विधानभवनात बोलत असताना पंकजा मुंडे धसांवर बोलताना भडकल्याचे पाहायला मिळाले. ”एका वृत्तपत्रातील पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्यावर मी त्यांना सांगितलं, मी यावर उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्याने उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, असं तुम्ही बोललात का? त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. ”ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. विधानसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली असा सुरेश धसांचा आरोप आहे, असा सवाल पंकजा मुंडे यांना केला असता त्या म्हणाल्या की, ”मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा. या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता”

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
