Special Report | ठाकरे शेवटपर्यत लढणार, फडणवीसांच्या बैठका!

भाजपकडून वारंवार वेट अँड वॉच असं सांगण्यात येत असलं तरी भाजपमध्ये मात्र राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत.

महादेव कांबळे

|

Jun 28, 2022 | 9:21 PM

भाजपकडून वारंवार वेट अँड वॉच असं सांगण्यात येत असलं तरी भाजपमध्ये मात्र राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुरू झाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करावी असंही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपची आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें