Gopichand Padalkar : ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर ठाम! राज्यभर निषेध अन् पडळकर म्हणताय होऊद्या… फडणवीसांनी समज देऊनही मुजोरी!
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. तर पडळकरांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात आक्रोश पाहायला मिळत आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून असे समजते की, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेबाबत ते सध्या काहीही बोलण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबांबाबत झालेल्या विधानांवर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की ते यावर नंतर बोलतील. त्यांच्या वक्तव्याला राज्यभर विरोध होत असताना त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर निषेध होऊद्या असं म्हणत मुजोरीची भाषा वापरली. पडळकर एका बैठकीत सहभागी होत होते, जिथे ओमप्रकाश शेटे यांच्यासह महात्मा फुले जन आरोग्य योजनेची चर्चा झाली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

