Nitesh Rane | ‘..तर उद्धव ठाकरेंना आधी गेट आऊट केलं असतं’, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नव्हते. मात्र, कालच्या भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय. 

दसरा मेळाल्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नव्हते. मात्र, कालच्या भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना तुम्हाला पहिल्यापासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणूनच तुम्ही पूजापाठ केले. राजसाहेब, राणेसाहेबांना षडयंत्र करुन बाहेर केलं. रावते, शिंदेंसारख्या कडवट शिवसैनिकांना माझं आवाहन आहे. मी लहान आहे. पण तुम्हाला कधीच संधी मिळणार नाही. ठाकरे परिवार सोडून एकजणही मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशिवाय कुणीही कधी मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही नितेश राणेंनी केलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI