अजितदादांसमोर भाजप आमदाराची भाईगिरी, थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली अन्… बघा व्हिडीओ
पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देखील लगावल्याचा प्रकार घडला.
पुणे, ५ जानेवारी २०२४ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देखील लगावल्याचा प्रकार घडला. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. कार्यक्रम संपल्यावर भाजप आमदारानं एकाच्या कानशिलात लागवल्याची गंभीर दाखल अजित पवार यांनी घेतल्याची माहितीही मिळत आहे.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?

